गडचिरोली पोलीसांनी केली दारु सह मुद्देमाल जप्त

श्री.अनिल गुरनुले, प्रतिनिधी,  न्यूज जागर 

बोरी/लगाम -: गडचिरोली जिल्ह्यात सन १९९३ पासून दारुबंदी लागू करण्यात आली मात्र या जिल्ह्यात दारूबंदी ही कागदावरच असल्याचे दिसून येते सदर जिल्हा हा दारुबंदी जिल्हा म्हणून ओळखले जातात मात्र याच जिल्ह्यात अवैध रीत्याने दारुची तस्करी होत आहे जवळच लागून असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी शासनाने हटवून मार्च २०२१ पासून सूरूवात केली आहे यामुळे गडचिरोली जिल्ह्यात भरपुर प्रमाणात अवैध रीत्याने दारुची तस्करी व विक्री केली जाते अशातच दिनांक २० सप्टेंबर रोजी गडचिरोली येथील स्थानिक गुन्हे शाखेचे चमू यांनी गोपीनीय माहीतीच्या आधारे सापळा रचून दोन लाख सतरा हजार सहाशे रुपयांची दारू सह पाच लाखांची मुद्देमाल जप्त केले.

चंद्रपूर – अहेरी मार्गाने भारत सरकार (UT) असे लिहून असलेली टाटा सफारी कंपनीची वाहन क्रमांक MH-34-M-9935 व चेवरोलेट सेल्स कंपनीची MH- 34 AM 0373 या दोन वाहनाने अवैध दारूची तस्करी होत असल्याचे गोपनीय माहिती गडचिरोली येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या विभागास माहीती मीळताच त्यांनी अहेरी तालुक्यातील शिवणीपाठ येथून पश्चिमेस १५ कीमी अंतरावर वाहनेचा पाठलाग करुन दोन लाख सतरा हजार सहाशे रुपयांची (2,17,600)अवैध दारूसह ४ लाख रूपयांची टाटा सफारी कंपनी व १ लाख रुपयांची चेवरोलेट सेल्स कंपनीची चार चाकी वाहन असा एकूण सात लाख सतरा हजार सहाशे रुपयांची मुद्देमाल जप्त केली यात १)शक्ती संजीव शाहा रा.चंद्रपुर वय (३९) वर्ष २) रतन निर्मल राँय रा.चंद्रपुर वय(३६) वर्ष ३) अमित विनोद मंडल रा.चंद्रपुर वय (३०) वर्ष ४) कीशोर राजन्ना अडूरवार रा.शिवणीपाठ वय (३३) वर्ष असे आरोपीचे नावे असून सदर आरोपी यांच्या वर महाराष्ट्र दारूबंदी अभियान कलम ६५(अ),८३,९८,(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे सदर कारवाई ही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री सौरभ गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शाखा विभागाचे पोलिस हवालदार श्री निलकंठ पेंदाम, श्री संजय चक्कावार, श्री सत्यमकुमार लोहमबरे, पोलिस शिपाई श्री दिनेश कुथे, पोलीस वाहन चालक श्री रमेश बेसरा यांनी केली आहे.