गडचिरोलीतील मीनाबाजारात न गेलेलेच बरे -रुपेश वलके राष्ट्रवादी युवक विधानसभा अध्यक्ष गडचिरोली यांचे पालकांना आवाहन

गडचिरोली शहर प्रतिनिधी,न्यूज जागर

गडचिरोली शहरात मिना बाजार सुरू असून लहाण मुलांसाठी ते आकर्षणाचे केंद्र ठरले आहे, पण हि हौस लहाण मुलांच्या जीवावर बेतू शकते

दोन दिवसापुर्वि काही मुले उड्या घेऊन (हवेद्वारे फुगवुण घसरपटटीवर उड्या मारणारा खेळ } खेळत असतांना तेथिल हवा अचानकपणे निघून गेल्याने लहाण मुलांना थोडा फार मार लागलेला आहे.

आयोजकांचा त्यांच्या साहित्याप्रती आणि लहान मुलांच्या जीवाप्रती निष्काळजीपणा यातुन दिसुण येतो, या प्रकारामुळे मार लागलेल्या पालकांनी नाराजी व्यक्त केली.

पार्किंग दर २० रुपये, प्रवेश दर 30 रु. इतकी अधिकची आगाऊ रक्कम घेऊणसुद्धा असा दुर्लक्षितपणा असेल, आणि कोणत्याही प्रकारची विमा सुविधा नसेल तर , अश्या ठिकाणी न गेलेलेच बरे असे तिथे उपस्थित असलेले पालक श्री. रुपेश वलके राष्ट्रवादी युवक विधानसभा अध्यक्ष गडचिरोली यांणी आपली भावना व्यक्त करतांना म्हटले आहे .