सावली तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. धनंजय आंबटकर विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदाच्या गुणवत्ता यादीत प्रथम

Adv.Dhananjay-Ambatkar
Adv.Dhananjay-Ambatkar

श्री.अरुण बारसागडे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्युज जागर

चंद्रपूर,दि.०२/०५/२०२३

सावली येथील दिवाणी व फौजदारी कनिष्ठ न्यायालयाचे प्रसिद्ध वकील तसेच सावली तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. धनंजय आंबटकर हे विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदाच्या गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक प्राप्त केले असून आता लवकरच त्यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केल्या जाईल.

शासनाच्या वतीने फौजदारी प्रक्रिया सहींता 1973 कलम 25 (3) अंतर्गत विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदाच्या मुलाखती निवड समिती चे अध्यक्ष जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या नेतृत्वाखाली पार पडल्या. त्यात अँड. धनंजय विश्वासराव आंबटकर हे प्रथम क्रमांकाने आहे. अँड. धनंजय आंबटकर हे अत्यंत हुशार व्यक्तिमत्व असून त्यांच्या या यशस्वी कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे. newsjagar